esakal | आमदार रोहित पवारांनी १० जेसीबीने एकाच दिवसात सात किलोमीटरचा कॅनेल करुन पहिल्यांदाच आणले पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

In Jamkhed taluka MLA Rohit Pawar repaired a seven kilometer canal

पिंपळगाव आळवा लघु प्रकल्प ओहरफ्लो होताच हे पाणी कमांड ऐरीयातील पाझर तलाव भरुन घेण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेऊन एका दिवसात १० जेसीबीच्या माध्यमातून सात किलोमीटरच्या कालव्याची दुरुस्ती केली अन्‌ महारुळी (ता. जामखेड) येथील तलाव भरुन घेतला.

आमदार रोहित पवारांनी १० जेसीबीने एकाच दिवसात सात किलोमीटरचा कॅनेल करुन पहिल्यांदाच आणले पाणी

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : पिंपळगाव आळवा लघु प्रकल्प ओहरफ्लो होताच हे पाणी कमांड ऐरीयातील पाझर तलाव भरुन घेण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेऊन एका दिवसात १० जेसीबीच्या माध्यमातून सात किलोमीटरच्या कालव्याची दुरुस्ती केली अन्‌ महारुळी (ता. जामखेड) येथील तलाव भरुन घेतला. आमदार पवारांनी दाखवलेली कार्यतत्पर्ता पाहून येथील बळीराजा सुखावला. चाळीस वर्षात पहिल्यांदाच अशा पध्दतीने तलावात पाणी पोहचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंद ते लपू शकले नाहीत.

तालुक्यातील शंभर दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असलेला पिंपळगाव (आळवा) लघु प्रकल्प;  दरवर्षी ओवरफ्लो' होतो. मात्र ओहरफ्लोचे पाणी नदीला वाहून जाते. हे पाणी कमांड एरीयातील तलाव भरण्यासाठी वापरले तर या भागातील शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होईल. हे आमदार रोहित पवारांनी ओळखले आणि पुढाकार घेऊन सात किलोमीटरवर असलेला महारुळी तलाव भरण्याचे नियोजन हाती घेतले.

महाररुळी तलावाचा इतिहास
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब पवार ऊर्फ बी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने रोजगार हमी योजनेतून हा तलाव साकारला होता. या तलावामुळे पंचक्रोशीतील विहिरींच्या स्रोताला बळकटी मिळून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, असा उद्देश होता. मात्र पाऊसाच्या लहरीपणामुळे हा तलाव दरवर्षी भरत नव्हता. विशेष म्हणजे या तलावापर्यंत पिंपळगाव (आळवा) लघु प्रकल्पाचा सात किलोमीटरचा कँनल पोहचलेला होता. मात्र कँनलही नादुरुस्त असल्याने आवर्तनच बंद होते तर 'ओहरफ्लो'चे पाणी सोडण्याचा प्रश्नच नाही. तसा विचारही कोणी केला नव्हता. मात्र आमदार रोहित पवारांनी तो विचार केला आणि नियोजन हाती घेतले.
सात किलोमीटरच्या कालव्याची एका दिवसात दहा जेसीबी मशीन लावून दुरुस्ती केली. पिंपळगाव तलावातून पाणी सोडून महारुळी तलाव भरुन घेतला. हा तलाव भरल्याने वाघा, महारुळी, गुरेवाडी, नान्नज येथील शेतकऱ्यांसाठी रब्बीच्या पिकाकरिता पाण्याची व्यवस्था झाली आहे.

चाळीस वर्षात पहिल्यांदाच घडले आमदार रोहित पवारांचे शेतकऱ्यांनी कौतुक केले. चाळीस वर्षापूर्वी झालेल्या या पाझर तलावांमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने 'ओहरफ्लो'चे पाणी सोडण्याचे नियोजन झाले. प्रकल्प भरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच योग्य व्यक्ती आपल नेतृत्व करीत असल्याचे समाधान व्यक्त केले आहे. आमदार रोहित पवार यांनी दाखविलेला दूरदृष्टीपणा या भागातील शेतकऱ्यांच्या मनात कायम राहील, हे मात्र निश्चित!

संपादन : अशोक मुरुमकर