जामखेडचा जनता कर्फ्यू आजपासून शिथिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनता कर्फ्यू

सकाळी अकरानंतर अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय कारणांशिवाय कोणासही घराबाहेर पडता येणार नाही. अन्यथा कारवाई करण्यात येईल,

जामखेडचा जनता कर्फ्यू आजपासून शिथिल

जामखेड : येथील "जनता कर्फ्यू' आजपासून (ता. 21) शिथिल करण्यात आला आहे. मात्र, दहा दिवसांकरिता काही निर्बंध निश्‍चित करून, रोज चार तासांकरिता अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. )Jamkhed's public curfew relaxed from today)

हेही वाचा: गांधींची टिळकांसाठी सभा, महिलेने दिली हातातील सोन्याची पाटली

तालुक्‍यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत, शहरात 10 ते 20 मेदरम्यान कडकडीत "जनता कर्फ्यू' लागू करण्यात आला होता. यादरम्यान अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद होत्या. त्याची मुदत आज (ता. 20) संपली. प्रशासनाने उद्यापासून (ता. 21) नवीन नियमावली जाहीर केली आहे.

त्यानुसार आजपासून (ता. 21) 31 मेपर्यंत किराणा दुकाने, दूध डेअरी, भाजीविक्री, अंडी- मटणविक्री व कृषी सेवा केंद्रे सकाळी 7 ते 11 दरम्यान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली.

सकाळी अकरानंतर अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय कारणांशिवाय कोणासही घराबाहेर पडता येणार नाही. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (Jamkhed's public curfew relaxed from today)

loading image
go to top