ठरलं! जामखेडमध्येही ‘या’ तिन दिवसात राहणार कडकडीत बंद

ठरलं! जामखेडमध्येही ‘या’ तिन दिवसात राहणार कडकडीत बंद

जामखेड (अहमदनगर) : जामखेड तालुक्याची परिस्थिती पुन्हा बिकट झाली आहे. जे होऊ नाही यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले तेच घडले आहे. कोरोनाचा शिरकाव आता थेट ग्रामीण भागात झालाय. दररोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. पंधरवाड्यात ही संख्या दहावर पोहचली यापैकी तिघेजण बरे झालेत. तर सात जण क्वारंटाईन आहेत.
खबरदारी म्हणून आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची जामखेडला बैठक झाली. यावेळी या आठवड्यात 'जनता कर्फ्यू' वाढविण्यावर शिक्कामोर्तब झाले. या आठवड्यात तीन दिवस 'जनता कर्फ्यू' राहणार आहे. 'मेडिकल व हाँस्पिटल' वघळता सर्व अस्थापना या काळात बंद राहणार आहेत. १५ दिवसापासून जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम अधिकची लोकसंख्या असलेल्या जामखेड व खर्ड्यावर होऊ नाही याकरिता खबरदारीची उपाययोजना प्रशासनाने हाती घेतली आहे. जामखेड व खर्डा येथे तीन दिवस 'जनता कर्फ्यू'  पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या आठवड्यात या दोन्ही गावातील सर्व व्यावसाय व रहदारी तीन दिवस बंद राहिल, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट गडद; मात्र पूर्वानुभवाच्या बळावर संटावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज
जामखेड तालुक्यात कोरोनाचे संकट गडद होत असले तरी येथील लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार यांनी या संकटातून यापूर्वी जामखेडकरांना बाहेर काढले आहे.  'मिशन' म्हणून काम केले आहे. जामखेडकरांचा स्वतःचा पँटर्न तयार करून निर्माण झालेले संकट परतवून लावले होते.  लाँकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या 'हाँटस्पाँट'मधून जामखेडकरांना सहीसलामत बाहेर काढले होते. याकरिता राबविलेले विविध उपक्रम व उपाययोजनांमधून तालुक्याचा स्वतंत्र 'पँटर्न' तयार झाला आणि तो राज्यभर चर्चेचा ठरला. आमदार पवारांनी जनतेची काळजी म्हणून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राबविलेले विविध उपक्रम :

  • - संपूर्ण तालुक्यात तीन टप्प्यात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविली. सोडीअम फ्लोराईडच्या सोलुशनची फवारणी केली.
  • - शहरातील व तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर पेटींगच्या माध्यमातून जनजागृती केली.
  • - मास्क आणि सँनिटायझरचे मोठ्या प्रमाणात वाटप केले. 

खबरदारीच्या उपाययोजना केल्या

  • - घरातून कोणी बाहेर पडू नये तसेच घरात कोणाची उपासमार होऊ नये, याकरिता अन्नधान्य, किराणा, भाजीपाला वाटपाची मोहीम संपूर्ण तालुक्यात राबविली. तब्बल दोन महिने ही मोहीम सुरू राहिली.
  • - हाँटस्पाँटच्या काळात आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या पुढाकाराने घरपोहच अत्यावश्यक सेवेचा प्रशासनाकडून पुरवठा करण्यात आला.

याकामी आमदार कार्यालयाच्या टीमने संपूर्ण तालुक्यात सक्रिय पुढाकार घेऊन कर्तव्य तत्परता दाखवली. या टीमला तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, डॉ. युवराज खराडे, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी एकत्रित पणे सहकार्य केले. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि जनतेने दिलेला येथील लढा राज्यभर जामखेड पँटर्न ' या नावाने चर्चेत आला. एकजुटीपुढे कोरोनाचा निभाव लागला नाही आणि निर्माण झालेल्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर जामखेडकरांनी मात केली. हाँटस्पाँट हाटले. तालुका पुर्वपथावर आला.

काहीशी उसंत मिळाली. मात्र दरम्यानच्या काळात मुंबई- पुण्याहून कोरोनाचा 'वणवळा' तालुक्यात येऊन पोहचला आणि जामखेडकरांनी मोठ्या शिस्तीने परतवलेले हे संकट पुन्हा दारी पोहचले आहे. मात्र यावर मात करण्यासाठी पुन्हा 'जामखेड पँटर्न' संपूर्ण तालुक्यात राबविण्याची वेळ आली आहे. यावेळी काही इतर उपक्रमांचा अंतर्भाव करुन कोरोनाचे गडद होत असलेले संकट परतवून लावावे लागणार आहे. 

तहसीलदार विशाल नाईकवाडेंचे आवहन
जामखेड तालुक्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजूटीने स्वः शिस्तीचे पालन करून हे संकट परतवण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी पायीक होऊयात... रस्त्यावर फिरु नका, अत्यावश्यक असेल तरच घरा बाहेर पडा. अन्यथा घरात बसून स्वतःची आणि स्वतः च्या कुटुंबाची काळजी घ्या. सोशल डिस्टिंगशन पाळा. मास्क वापरा. स्टरलायजेशन करिता सँनिटायझरचा वापर करा. जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे तंतोतंत पालन करा, असे अवहान तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील वाढते, कोरोना रुग्ण लक्षात घेऊन व त्याचा प्रादुर्भाव जामखेड व खर्डा या मोठ्या शहरात होऊ नाही. याकरिता गुरुवार (ता. 16) ते शनिवारपर्यंत (ता. 18 जुलै) तीन दिवसाच्या काळात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या काळात दवाखाने व मेडिकल दुकाने ही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा व आस्थापना बंद राहतील, असेही सांगण्यात आले आहे.
जामखेड येथील एकात्मिक ग्रामीण आरोग्य प्रकल्प असलेल्या आरोळे हॉस्पिटलला भेट देऊन नियोजनासंदर्भात प्रशासकीय अधिकारी व डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी तिथं उपचार घेत असलेल्या पेशंटच्या तब्येतीचीही विचारपूस केली आणि काळजी घेण्यास सांगून आमदार रोहित पवार यांनी  लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com