कर्जत तालुक्यात ‘या’ दिवसापर्यंत पुन्हा जनता कर्फ्यू

निलेश दिवटे
Saturday, 18 July 2020

तालुक्यात आज पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. तसेच ही साखळी तोडण्यासाठी रविवारपासून (ता. १९) ते बुधवारपर्यंत (ता. २१) सलग तीन दिवस जनता कर्फ्यु वाढविण्यात आला आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यात आज पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. तसेच ही साखळी तोडण्यासाठी रविवारपासून (ता. १९) ते बुधवारपर्यंत (ता. २१) सलग तीन दिवस जनता कर्फ्यु वाढविण्यात आला आहे. संत गोदड महाराज रथ यात्रासाठी तीन दिवस जनता कर्फ्यु होता. त्याची मुदत आज संपली.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली असून एकूण १८ झाली आहे. तसेच २०८ जणांचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आज सकाळी कर्जत शहरातील एक व्यक्ती तर तालुक्यातील जळगाव (माही) येथील एक व्यक्ती अशा दोन व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत हे दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह आलेले व्यक्ती पूर्वी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील होते. कर्जत शहरातील डॉक्टरांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन केलेले असून यातील एक व्यक्ती आहे. तर दुसरी व्यक्ती जळगाव येथे यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती आहे. नागरिकानी स्वतः काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे.

पोलिस उपअधीक्षक संजत सातव म्हणाले, नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. अत्यावश्यक काम असेल तरच मास्क घालूनच घराबाहेर पडावे. अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल. तसेच गुन्हे दाखल करणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janta curfew in Karjat taluka Wednesday against the backdrop of Corona