
शिर्डीनगर : नगर व नाशिक जिल्ह्याच्या सिंचनावर दुष्परिणाम करणारे जायकवाडी धरण यंदा पहिल्यांदाच जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे पुढील दोन वर्षे नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सुखाचे जातील. हे धरण बांधल्यापासून गेल्या ४९ वर्षात पहिल्यांदाच जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले. आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गोदावरी नदीची खणा नारळाने ओटी भरून आणि महाआरती करून या धरणातून पाणी बाहेर काढण्यात आले. मराठवाड्याच्या दृष्टीने आजचा दिवस भाग्याचा ठरला.