
राहुरी : शहरात आज पहाटे भर बाजारपेठेत चोरट्यांनी धाडसी चोरी केली. वर्धमान ज्वेलर्स हे दुकान फोडून ३२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ३० किलो वजनाचे चांदीचे दागिने, मूर्ती, असा सुमारे ६० लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.