

अहिल्यानगर : सोने घडविण्याचे व दुरुस्तीचे काम करणाऱ्या परप्रांतीय सुवर्ण कारागिराने शहरातील सराफ व्यावसायिकाचे ८ लाख ९९ हजार ८६० रुपये किमतीचे सोने परत न देता त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ही घटना १४ एप्रिल २०२४ ते २४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सराफ बाजार येथील एस. व्ही. बुऱ्हाडे ज्वेलर्स दुकानात घडली.