शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८० हजार बेरोजगारांना दिली जाणार नोकरींची संधी

अशोक मुरुमकर
Tuesday, 8 December 2020

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस अवघ्या चार दिवसांवर आला आहे.

अहमदनगर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर विविध सामाजिक कार्यक्रमांची तयारी सुरु आहे. यानिमित्त विविध स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत. त्यातच राज्यातील ८० हजार बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : आमदार रोहित पवार यांना मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले अश्‍वासन
१२ डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस असतो. त्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातच बेरोजगारांना कौशल्य विकास विभागामार्फत नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्‌वारे सांगितले आहे.

यासाठी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ट्विटमध्ये आमदार पवार यांनी म्हटले आहे की, आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील ८० हजार बेरोजगारांना कौशल्य विकास विभागामार्फत नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक युवांनी 'महास्वयंम' पोर्टलवर (http://rojgar.mahaswayam.gov.in) आपली नोंदणी करावी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job opportunities for unemployed on the occasion of Sharad Pawar birthday