आमदार रोहित पवार यांना मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले अश्‍वासन

अशोक मुरुमकर
Tuesday, 8 December 2020

राज्यात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

अहमदनगर : राज्यात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यात सध्या सुधारणा होत आहे. मात्र, अनेक काम रखडलेली आहेत. घरकुल लाभार्थ्यांचे सुद्धा अनुदान थकले आहे. हे अनुदान मिळावं म्हणून राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे भेट घेऊन साकडे घातले आहे.

हेही वाचा : भारत बंद : नगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कशी स्थिती वाचा एकाच क्लिकवर

घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक लाभार्थींचे सध्या अनुदान थकल्याने कामे रखडली आहेत. घरकुल मिळावे म्हणून ग्रामपंचायत पात्र लाभार्थ्यांची यादी करते. त्यानंतर सरकार घर बांधण्यासाठी टप्प्या- टप्प्याने अनुदान देते. मात्र, अनुदान थकल्याने लाभार्थ्यांची घराची कामे रखडली आहेत. ही कामे पूर्ण करता यावीत म्हणून आमदार रोहित पवार यांनी अनुदान देण्याची मागणी मंत्री मुंडे यांची केली आहे.

याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना टॅग केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘राज्यातील आणि माझ्या मतदारसंघातील रमाई आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना घरांचं बांधकाम करता यावं म्हणून त्यांचं प्रलंबित अनुदान मिळावं. यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. याबाबत त्वरित निर्णय घेऊन सहकार्य करण्याचं आश्वासन मंत्री मुंडे यांनी दिलं आहे.

 

यापूर्वी आमदार पवार यांनी मंत्री धनंजय यांची भेट घेऊन ऊस तोड कामगारांच्या मुलांचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा प्रश्‍न सोडवण्याकडे लक्ष देण्याचे अश्‍वासन मुंडे यांनी दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar meet on Minister Dhananjay Munde