पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला न्याय

मनोज जोशी
Friday, 13 November 2020

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी कुठल्याही राजकिय दबावाला न जुमानता नागरिक, विशेषतः भगिनींना सुरक्षित वाटेल असे काम केले.

कोपरगाव (अहमदनगर) : शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी कुठल्याही राजकिय दबावाला न जुमानता नागरिक, विशेषतः भगिनींना सुरक्षित वाटेल असे काम केले.

कोरोना काळात जनतेने मास्क वापरावेत यासाठी कठोर धोरण ठेवले, "एक गाव एक गणपती" उपक्रम यशस्वी केला, गुन्हेगारी नियंत्रणात आणली, सामाजिक स्वास्थ्य ठेवले. कायदा सुव्यवस्था कठोरपणे राबवून सर्वसामान्य जनतेला न्याय दिला, असे प्रतिपादन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.

मानगावकर यांची नुकतीच नगर येथे बदली झाली त्यांना कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आदर सत्कार करून निरोप देण्यात आला.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,नगरसेवक अनिल आव्हाड, मेहमूद सय्यद, महारुद्र गालट,प्रमोद पाटील,योगेश वाणी,चंद्रकांत साठे,अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. मानगावकर यांनी शहरातील नागरिकांनी दिलेले सहकार्य व शुभेच्छा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.लहान मोठा असा कुठलाही भेदभाव न करता मी काम केले.महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवणे माझे कर्तव्य आहे.राजकिय हस्तक्षेप मला मान्य नसल्याने काम करणे सोपे झाले असेही त्यांनी सांगितले.यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Justice to the general public by Police Inspector Rakesh Mangaonkar