...तर कोरोनासारखे आजार कोसोमैल दूर पळतात : श्रीकांत जाधव

planting
planting

अकोले (अहमदनगर) : क्रिडापटूमध्ये प्रतिकार शक्ती अधिक असल्याने कोरोनासारखे आजार कोसोमैल दूर पळतात. मात्र त्यासाठी खेळ, व्यायाम करा. योग प्राणायाम, सूर्यनमस्कार, योग्य आहार घ्या. मोबाईल योग्य कामासाठीच हाताळा किंवा त्याला दूर सारून मैदानी खेळ खेळले तर आयुष्यभर निरोगी व प्रसन्न राहाल, असा सल्ला आंतरराष्ट्रीय प्रो कबड्डी खेळाडू श्रीकांत जाधव यांनी विधार्थ्यांशी सवांद साधताना दिला.

मवेशी येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विधालयात वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त ते आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी, पालक शेतकरी यांच्याशी मनमोकळेपणाने सवांद साधला. निसर्ग अभ्यासक रमाकांत डेरे, संस्थेचे सचिव बापू काळे, सरपंच शरद कोंडार, पांडुरंग भांगरे, पोलिस अधिकारी कैलास नेहे, मुख्याध्यापक विलास महाले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आंबा, जांभूळ, बांबू, साग झाडांचे रोपण करण्यात आले.

जाधव म्हणाले, मी दहिगाव (ता. शेवगाव) येथील. माझी आर्थिक परिस्थिती बेताची. वडील टायर पंक्चरचे दुकान चालवत. त्यात मला खेळाची आवड. मात्र अभ्यासात मी ढ. तरी मनात भारतीय सैन्य दलात किंवा मोठा खेळाडू व्हायचे ही उर्मी. मात्र घरात कुणी नोकरीला नाही. आर्थिक गणित कसे जमवायचे म्हणून मी मुंबईला गेलो. तिथे आर्मीच्या परीक्षेत फेल झालो. पुढे काय करायचे हा प्रश्न होता. दरम्यानी मी प्रो कबड्डीसाठी सराव करून २०१४ ला विदर्भाचे नेतृत्व केले. यावेळी दीपक होंडा, मानीदारसिंग, पवन शेखावत, रोहितकुमार, अभिषेक, अर्जुन, अतुल यांची भेट झाली. त्यात मी सर्वात लहान. माझे बंगाल वॅरियर्समध्ये प्रो कबड्डीची सिलेक्शन झाले. एक लाख ७५ हजार मानधन मिळणार होते. २४ जुलै स्पर्धा होती, मात्र माझा २१ जुलैला अपघात झाला. माझी ही संधी हुकली, माझेकडे अर्थिक परिस्थिती नसल्याने मित्रांनी वर्गणी व व्याजाने पैसे घेऊन माझे ऑपरेशन केले. माझ्यातील आत्मविश्वास जागा होता. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा, असे म्हणून मी वर्षभर थांबून पुन्हा मुंबईला गेलो नी प्रो कबड्डीत सहभागी झालो. १३१ मॅच मध्ये फक्त ४२ वेळा पराभूत झालो. आज मी देशासाठी खेळतो. तुम्हीही आपण गरीब व खेड्यातील आहोत हा न्यून गंड बाजूला सारून मनात ध्येय असेल व जिद्द, चिकाटी सातत्य असेल तर तुमच्या ध्येयाला जगातील कोणतीही ताकद थोपवू शकत नाही. मात्र देशाच्या संरक्षणसाठी आयपीएस होऊन संरक्षण दलात जा. देशाला तुमची गरज आहे. एका व्यक्तीने किमान पाच झाडे लावून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश त्यांनी यावेळी दिला. आभार मच्छिंद्र देशमुख यांनी मानले.
संपादन : सुस्मिता वडतिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com