Kalusubai Landslide: कळसूबाईत भीषण भूस्खलन! ५० एकर भातशेती उद्ध्वस्त; २५ आदिवासी कुटुंबे थोडक्यात बचावली

25 Tribal Families Escape Kalsubai Landslide: कळसूबाई शिखरावरील दरडी, पुराच्या महाप्रवाहाने गांगडवाडीची ५० एकर भातशेती चिखलात; आदिवासी शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त, पुनर्लागवडीसाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज
Akole Landslide News Massive Kalsubai Hill Collapse Devastates 50 Acres of Farmland Tribal Families Survive

Akole Landslide News Massive Kalsubai Hill Collapse Devastates 50 Acres of Farmland Tribal Families Survive

sakal

Updated on

अकोले : तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पश्चिम उतारावर झालेल्या भीषण भूस्खलनाने गांगडवाडी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले. डोंगरावरील प्रचंड दरड, झाडे, दगड, माती आणि बंधारे तब्बल एक किलोमीटर घसरत खाली आली. त्याच वेळी आलेल्या प्रचंड पुराच्या पाण्याने ओढ्याने दिशा बदलत थेट भातशेतीत प्रवेश केला आणि सुमारे ५० एकरांवरील भातपिकाचा अक्षरशः चिखल केला. सुदैवाने हा माती-दगडांचा महाप्रवाह गांगडवाडीच्या उंबरठ्यावर थांबल्याने २५ आदिवासी कुटुंबे थोडक्यात बचावली; तसेच माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com