esakal | कान्हूर पठार पतसंस्थेने पार केला चारशे कोटी ठेवींचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

Kanhur Plateau Credit Union has crossed the 400 crore deposit mark.jpg

ठुबे म्हणाले, संस्थेने चारशे कोटीचा टप्पा पार करत मार्च अखेर ४०४ कोटी रूपयांच्या ठेवी संस्थेकडे आहेत. या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये ४६ कोटींची वाढ झाली.

कान्हूर पठार पतसंस्थेने पार केला चारशे कोटी ठेवींचा टप्पा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : येथील कान्हूर पठार पतसंस्थेने ३१ मार्च रोजीच आर्थिक पत्रके जाहीर करण्याची पंरपरा या वर्षी कायम ठेवत ताळेबंद, नफा, तोटा जाहीर केला आहे. पतसंस्थेने ठेवींचा चारशे कोटी रूपयांचा टप्पा पार केला असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांनी दिली.

ठुबे म्हणाले, संस्थेने चारशे कोटीचा टप्पा पार करत मार्च अखेर ४०४ कोटी रूपयांच्या ठेवी संस्थेकडे आहेत. या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये ४६ कोटींची वाढ झाली. आर्थिक वर्षात संस्थेस ढोबळ नफा ८ कोटी रूपये झाला. सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा ३ कोटी झाला आहे. विविध बँकातील गुंतवणूक १७३ कोटी आहे. संस्थेने तरलतेचे प्रमाण योग्य पद्धतीने राखले आहे. त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे.

अध्यक्ष सुभाष नवले म्हणाले, वरील आर्थिक बाबींचा विचार करता संस्थेच्या सभासदांनी ठेवीदार कर्जदार यांनी संस्थेवर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला आहे. संस्थेकडे ३५ कोटी रूपयांचा स्वनिधी आहे. संस्थेने ग्राहकाभिमुख सेवा देताना बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कोअर बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार संस्थेने ग्राहकांना आरटीजीएस, एसएमएस सेवा सर्व शाखांमधून ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. यासोबत लाईट बिल भरणा, मोबाईल व डीश टीव्ही रीचार्ज या सेवाही उपलब्ध करून दिल्या आहेत.

उपाध्यक्ष राजेंद्र व्यवहारे म्हणाले, संस्थेच्या बारा शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. संस्थेचे खेळते भांडवल ५०० कोटी रूपये आहे. अशा प्रकारे संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय सक्षम आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक व्यवहार दिवसेंदिवस वाढत असून संस्था प्रगतीपथावर आहे.