

Kanwade Couple Completes 35,000 km Bicycle Journey
sakal
-राजू नरवडे
संगमनेर: जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे संगमनेर येथील कानवडे दाम्पत्याने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. सेवानिवृत्त प्राचार्य बाजीराव कानवडे आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका हिराबाई कानवडे यांनी सायकलिंगची आवड जोपासत आजवर ३५ हजार किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला आहे. त्यांचा हा प्रवास समाजाला आरोग्य, पर्यावरण व सामाजिक जाणीवेचा संदेश देणारा ठरत आहे.