

Lush banana plantations cultivated by young farmers in drought-prone Karapadi village.
sakal
राशीन : एकेकाळी दुष्काळाची छाया आणि पाण्याअभावी ओसाड झालेली शेती अशी ओळख असलेल्या कर्जत तालुक्यातील करपडी गावाने आज इतिहास रचला आहे. पाणी व्यवस्थापन, आधुनिक शेतीतंत्र व तरुणाईच्या जिद्दीच्या जोरावर या गावात केळीच्या बागा बहरल्या असून, येथील केळीने थेट जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. करपडीतील केळीची इराणमध्ये निर्यात सुरू झाली आहे.