esakal | कराटेचालकास पोलिसांनी मारला पंच
sakal

बोलून बातमी शोधा

Karate class driver fined in Parner taluka

कराटेचालकास पोलिसांचा पंच

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

पारनेर : राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने आज (ता. 15 ) पासून राज्यात लॉकडाऊन सुरू झाले. मात्र तरी सुद्धा लोक नियम मोडत आहेत. या नियम मोडणारांना पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे व पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी चांगलाच खाक्या दाखवला. आज सकाळीच एका कराटे क्लास चालकास 10 हजार तर उपस्थित मुलांच्या पालकांना प्रत्येकी पाचशे रूपये दंड तसेच विनाकारण फिरणारे व नियम मोडणारांना चांगलेच सुनावले.

राज्यभर कोरोनाने हाहाकार माजविला आहे दररोज कोरोना रूग्णांच्या संखेत मोठी वाढ होत आहे त्याच बरोबर मृत्यू दरही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या मुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसाचा जाहीर करण्यात आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या कडक निर्बंधाची पारनेर शहरासह तालुक्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

आज सकाळी शहरात विनापरवानगी कराटे क्लास घेणाऱ्या चालकास 10 हजार रूपये तर जी मुले उपस्थीत होती त्या मुलांच्या पालकांना प्रेतेकी पाचशे रूपये प्रमाणे 15 हजार रूपये दंड तहसीलदार दोवरे यांनी केला या वेळी पोलिस निरीक्षक बळप हे ही उपस्थीत होते.

या वेळी बळप यांनी उपस्थीत मुले घाबरून जाऊ नयेत म्हणून मुलांशी गप्पा मारत त्या मुलांना चॉकलेटही वाटले. त्यामुळे ती मुले पालकांना जरी दंड झाला असला तरी चॉकलेट मिळाल्याने खूष झाली होती.

पारनेर शहरात बसस्थानक चौकात नाकेबंदी केली होती. तेथे विनाकारण व मास्क शिवाय फिरणाऱ्यांची चोकशी केली जात होती. तसेच वाहननांची तपासणी सुरू होती.

सर्व बाजारपेठा बंद

राज्य सरकारच्या लॉकडाऊन निर्णयानुसार आज तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावहार कडकडीत बंद झाले आहेत. पारनेर शहरासह सुपे, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, कान्हूर पठार, निघोज, जवळा, अळकुटी या बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे गावागावातव रस्त्यावर शुकशुकाट झाला होता. नगर-पुणे महामार्गावरही अतीशय तुरळक वाहतुक सुरू होती. जाणवत आहे. ठेतील गावांमध्येही शुकशुकाटच आहे.