कर्जतमध्ये 96 व्यापारी कोरोनाबाधित; कर्जतकरांची वाढली धाकधूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

In Karjat 96 traders have been infected with corona

तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे

कर्जतमध्ये 96 व्यापारी कोरोनाबाधित; कर्जतकरांची वाढली धाकधूक

कर्जत (अहमदनगर) : तालुक्‍यातील विक्रेत्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत 415 व्यापाऱ्यांनी चाचणी केली. त्यांतील 96 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे कर्जतकरांची धाकधूक वाढली आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्षांचे राजीनामे मंजूर; प्राथमिक शिक्षक बॅंक पदाधिकाऱ्यांची आठ एप्रिलला होणार निवड
 
तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विविध विक्रेत्यांना प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कोविड तपासणीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत तालुक्‍यातील 415 जणांनी तपासणी केली. त्यात 96 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
 
मंगळवारी 96 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात कर्जत व मिरजगाव येथे प्रत्येकी 21, माळेवाडी येथे 19, घुमरी येथे 7, बाभूळगाव खालसा येथे 6, तिखी येथे 4, गणेशवाडी, कोरेगाव व वडगाव तनपुरे येथे प्रत्येकी 3, कोंभळी व कुळधरण येथे प्रत्येकी 2, तसेच बर्गेवाडी, भांबोरे, दूरगाव, राशीन, शिंदे, अळसुंदे, बहिरोबावाडी, चापडगाव, कोकणगाव, नागमठाण व रवळगावळी येथे प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आढळला. 

Web Title: Karjat 96 Traders Have Been Infected Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AhmednagarBabhulgaon