esakal | दुष्काळग्रस्त कर्जत-जामखेडची वाटचाल सुबत्तेकडे, पवारांनी घेतलाय वसा
sakal

बोलून बातमी शोधा

Karjat-Jamkhed's journey towards prosperity

तालुक्यात सर्वात मोठे गाव असलेल्या जामखेडसाठी १०६ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजुर केली. शेतीकरिता बाहेरुन पाणी आणण्यासाठी नियोजन आमदार पवारांनी हाती घेतले आहे.

दुष्काळग्रस्त कर्जत-जामखेडची वाटचाल सुबत्तेकडे, पवारांनी घेतलाय वसा

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके आवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतात; त्यामुळे शेतीच्या पाण्याचे सोडा येथे पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष पाचवीला पुंजलेले; दोन वर्षातून एकवेळा या दोन्ही तालुक्यांना टँकरचा आधार घ्यावाच लागतो, या जोखडातून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, ते तोकडे पडले. यावर कायमस्वरूपी मात करण्याचा निर्धार आमदार रोहित पवारांनी केलाय;आणि कामही सुरु केलंय.

नदी, ओढा खोलीकरण, पाझरतलावातून ओव्हरफ्लो होणारे पाणी जाणीव पूर्वक आडविण्यासाठी प्रयत्न हाती घेतले आहेत.मोठ्या गावांसाठी नळपाणी पुरवठा योजनाही त्यांनी हाती घेतल्या आहेत. पुढच्या टप्प्यात आणखी नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस त्यांचा आहे.

तालुक्यात सर्वात मोठे गाव असलेल्या जामखेडसाठी १०६ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजुर केली. शेतीकरिता बाहेरुन पाणी आणण्यासाठी नियोजन आमदार पवारांनी हाती घेतले आहे. त्या कामाचे सर्वेक्षण झाले आहे. पुढची कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान तालुक्यात पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब ना थेंब कसा आडवता येईल, या कामाला त्यांनी प्राधान्य दिले. सरकारच्या मदतीशिवाय स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवारांची साथ दिली, नव्हे नव्हे तर ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर च घेतली. राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देऊन  पाऊलं टाकाली आहेत. 
एकापाठोपाठ जलसंधरणाचे काम सुरू झाले ते ही सरकारी मदतीशिवाय . निरनिराळ्या सामाजिक संस्थांची मदत याकामी त्यांनीच मिळवली. 

ही कामे साकारली

जामखेड शहरारातून जाणारी विंचरणा नदीला लक्ष बनवून स्वच्छ, सुंदर व शुशोभिकरण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागणार्या व टँकर वर आवलंबून रहावे लागणार्या आरणगाव, बावी व पिंपरखेड या गावांकडे  आपला मोर्चा वळविला.आरणगाव येथे नाला खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. या निमित्ताने पाण्याचे योग्य नियोजन करणे, गावातील भूजल पातळी वाढवणे. हा संदेश त्यांनी ग्रामस्थांना दिला. बावी येथील पाझर तलाव क्रमांक एकमधले 'ओव्हरफ्लो' चे पाणी पाझर तलाव क्रमांक दोन मध्ये घेतले.

वाहून जाणारे पाणी यानिमित्ताने आढविले. या निमित्ताने ग्रामस्थांनाही पाण्याचे महत्त्व समजले. पिंपरखेड ला ओढ्याद्वारे जाणारे पाणी शेजारील पाझर तलाव क्रमांक दोनमध्ये पाईप लाईन करून घेतले. या करिता कुठली सरकारी मदत त्यांनी घेतली नाही. ग्रामस्थांना या निमित्ताने लोकसहभागातून काम करण्याची सवय लागावी आणि पाण्याचे महत्त्व समजावे हा संदेश त्यांनी दिला आहे.

यांची झाली मदत 

'नाम ' फौंडेशनने मशीन दिले. गावाने लोकसहभाग नोंदविला. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थाने तांत्रिक मदत व पाईप लाईनद्वारे ही कामे पूर्ण केली आहेत.

सुरू असलेल्या कामांवर सुनंदाताई चे आहे लक्ष

जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांवर आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवारांचे बारकाईने लक्ष आहे. त्या वेळोवेळी या कामांची पहाणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधून जलसंधारणाचे महत्त्व समजावून सांगतात.दोन दिवसापूर्वीच त्यांनी बावी येथे सुरू असलेल्या कामाला भेट दिली. ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांना जलसंधारणा बरोबरच स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image