
श्रीगोंदे : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेण्यासाठी कर्जत पोलिसांनी येथील न्यायालयाच्या बाहेर सापळा लावला. पोलिसांना चकवा देत आरोपीने धूम ठोकली. मात्र, पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. शहरातील वडाळी रस्ता परिसरात हा सिनेस्टाईल पाठलागाचा थरार रंगला.