कर्जत : आरक्षण सोडतीने राजकीय वातावरण तापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Political atmosphere heats up

कर्जत : आरक्षण सोडतीने राजकीय वातावरण तापले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर (कर्जत) : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) प्रभागनिहाय आरक्षण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी जाहीर केले. यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते. तसेच विविध पक्षांचे इच्छुक, पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक काही प्रभागात दुरंगी, तिरंगी किंवा बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

प्रभाग निहाय आरक्षण असे ः सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित प्रभाग- सहा, आठ, नऊ, बारा, सतरा. सर्वसाधारण स्त्री राखीव प्रभाग- दोन, चार, दहा, अकरा, तेरा, चौदा. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव प्रभाग- पाच, सात. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव प्रभाग- एक, तीन. अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग पंधरा. अनुसूचित जाती स्त्री राखीव प्रभाग- सोळा. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, कर्जत जामखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, प्रसाद ढोकरीकर, ओंकार तोटे, रामदास हजारे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विनोद दळवी, भाजपचे दादा सोनमाळी, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, भास्कर भैलुमे, बंटी यादव, भाऊसाहेब तोरडमल, माजी सरपंच संतोष म्हेत्रे आदी उपस्थित होते.

राजवीर पोटरे, प्रणाली सुतार व शोभराज यादव या तीन बालकांनी आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या. सर्वच इच्छुक उमेदवारांच्या मनासारखे आरक्षण निघाल्याने या बालकांचे कौतुक करून त्यांना खाऊ देण्यात आला.

जिल्ह्यातील पारनेर, अकोले व कर्जत नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापलेले आहे. या नगरपंचायत निवडणुकीत आघाडी सरकारमधील सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपाविरोधी लढा देणार की स्वतंत्र निवडणूक लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

पारनेरमध्ये अनेक इच्छुकांचा स्वप्नभंग

नव्याने पारनेर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी आज (ता. १५) प्रांताधिकारी सुधाकर भोसले व मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले.

यात या पूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणानुसार अनेक इच्छुकांनी केलेल्या मतदारावरील खर्च नवीन आरक्षणामुळे वाया गेला आहे. अनेकांनी इतके दिवस केलेली तयारीही वाया जाणार का, असा प्रश्न आता अनेकांसमोर उपस्थित झाला आहे.

या पुर्वी वर्षभरापूर्वी नोव्हेंबर २०२० ला नगरपंचायतीसाठी आरक्षण जाहीर झाले होते. मात्र, कोरोणामुळे निवडणुका लांबणीवर गेल्याने व आरक्षणात बदल झाल्याने आता पुन्हा आरक्षण काढण्यात आले. एका इतर मागासवर्गीय जागेचे आरक्षण रद्द झाल्याने आज नव्याने आरक्षण काढण्यात आले. त्यामुळे काही प्रभागातील आरक्षणात बदल झाला आहे. त्यामुळे इच्छूकांमध्ये कुछ खुशी कुछ गम अशी अवस्था निर्माण झाली आहे. तीच असस्था काही प्रमाणात राजकीय पक्षांची झाली आहे. कारण आपल्या मनातील उमेद्वार आता राजकिय नेत्यांना उभा करण्यात आडचणी येणार आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी दिवाळी भेट वस्तू, मिठाईचे वाटप केले होते. तसेच काहींनी तर मतदारांसाठी सहलीही घडविल्या होत्या. त्यामुळे अनेक इच्छूकांचा केलेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. काहीजण सुखावले आहेत. आज नव्याने सतरा प्रभागात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढली ती अशी : प्रभाग आणि आरक्षण : (कंसात प्रभाग क्रमांक)

सर्वसाधारण महिला (प्रभाग एक), नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (प्रभाग दोन), सर्वसाधारण (प्रभाग तीन), सर्वसाधारण (प्रभाग चार), सर्वसाधारण (प्रभाग पाच ), सर्वसाधारण महिला (प्रभाग सहा), सर्वसाधारण महिला (प्रभाग सात), अनुसूचित जाती (प्रभाग आठ), सर्वसाधारण (प्रभाग नऊ), सर्वसाधारण महिला (प्रभाग १०), नागरीकाचा मागास प्रवर्ग महीला (प्रभाग ११), सर्वसाधारण महिला(प्रभाग १२), नागरीकाचा मागास प्रवर्ग (प्रभाग १३), नागरीकाचा मागास प्रवर्ग (प्रभाग १४ ), सर्वसाधारण महिला (प्रभाग १५), सर्वसाधारण (प्रभाग १६) व सर्वसाधारण महिला (प्रभाग १७ ).

"नव्याने मतदार याद्या अद्यायावत करूण त्यांना प्रसिद्धी दिली जाईल. त्यावर पुन्हा नागरीकांच्या हरकती मागविण्यात येतील. त्यावर सुनावणी होईल व त्यानंतर अंतीम मतदार याद्या तयार होतील. त्यानंतरच निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुक प्रक्रीया राबविली जाणार आहे."

- डॉ. सुनिता कुमावत, मुख्याधिकारी

loading image
go to top