
अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला आरोपी साईनाथ कल्याण कवडे (वय २८, रा. कुरूडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याला पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गुजरात येथे बेड्या ठोकल्या. फसवणूक करून गुन्हा दाखल होण्यापूर्वीच कवडे फरार झाला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.