esakal | केदारेश्‍वर साखर कारखान्याने राज्यातील कारखान्यांना प्रेरणा दिली
sakal

बोलून बातमी शोधा

The Kedareshwar Sugar Factory inspired the factories in the state

केदारेश्वर साखर कारखान्याने राज्यातील इतर अडचणीतील साखर कारखान्यांना प्रेरणा दिली आहे.

केदारेश्‍वर साखर कारखान्याने राज्यातील कारखान्यांना प्रेरणा दिली

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : अडचणीत असतानाही केवळ शेतकरी व कामगारांचे हीत डोळ्यासमोर ठेवून चालवल्या जाणाऱ्या केदारेश्वर साखर कारखान्याने राज्यातील इतर अडचणीतील साखर कारखान्यांना प्रेरणा दिली आहे. या पुढील काळात कारखान्यांनी स्वनिधी निर्माण करुन अडचणींवर मात करावी, असे प्रतिपादन लोकमंगल कारखान्याचे संस्थापक संचालक अविनाश महागावकर यांनी केले. 

बोधेगाव (ता. शेवगाव) येथील केदारेश्वर कारखान्याने एक लाख साखर पोत्यांचे उत्पादन केले. त्याचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रियमंत्री बबनराव ढाकणे हे होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे, उपाध्यक्ष प्रकाश घनवट, जिल्हा परिषध सदस्या प्रभावती ढाकणे, मुख्यकार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता सी.डी.फकीर, ऊस शास्त्रज्ञ सुभाष जमधाडे, बाळकृष्ण गिते, मयूर बंब, व्यंकटेश मल्टीस्टेचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे, वैभव दहिफळे, सुरेश होळकर, भाऊसाहेब मुंढे, राजेंद्र दौंड, सतीश गव्हाणे, रमेश गर्जे आदी प्रमुख उपस्थित होते. 

बबनराव ढाकणे म्हणाले की, कारखान्याची निर्मिती व वाटचाल अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडत झाली आहे. ऊस तोडणी कामगारांना त्यांच्या हकाचा साखर कारखाना असावा या उद्देशाने आपण तो उभा केला. त्यामुळे परिसरात विकासाला चालणा मिळाली आहे. ऊस व साखरेचे विक्रमी उत्पादन यामुळे घसरलेले बाजारभाव याचा परिणाम कारखान्यांच्या अर्थकारणावर झाला असून त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकार व कारखानदार यांनी एकत्र येण्याची गरज आहे. कारखान्याला ऊस देणा-या उत्पादक शेतक-यांच्या पेमेंटचे 10 कोटी रुपये येत्या आठवडयाभरात बँकेत वर्ग करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांनी तर सुत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. तर संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image