
अहिल्यानगर : जिल्ह्यामध्ये खरिपाची सरासरी ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये काही प्रमुख पिके आहेत, त्यात साधारणपणे कापूस दीड लाख हेक्टर, सोयाबीन दीड लाख हेक्टर, तसेच सध्या मका पिकाखालील क्षेत्रदेखील वाढत आहे. त्यात ९० हजार हेक्टर एक क्षेत्र आहे. बाजरी, मूग, तूर, उडीद यासारख्या पिकांचीदेखील पेरणी झाली आहे.