esakal | केके रेंज जमीन अधिग्रहणप्रश्नी न्यायालयात जाणार, खासदार सुजय विखे पाटलांचा निर्धार
sakal

बोलून बातमी शोधा

KK Range land acquisition issue to go to court, MP Sujay Vikhe Patil's decision

ढवळपुरी (ता.पारनेर) येथे आज के.के.रेंज जमीन अधिग्रहण विषयाबाबत खासदार विखे पाटील यांच्यासह माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी सवांद साधत भुमिका स्पष्ट केली.

केके रेंज जमीन अधिग्रहणप्रश्नी न्यायालयात जाणार, खासदार सुजय विखे पाटलांचा निर्धार

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : के.के.रेंज जमीन अधिग्रहण हा विषय १९८० पासुन सुरू आहे. सातत्याने मुदत वाढ भेटते आहे. मात्र, ही चर्चा थांबत नाही. यावर आंदोलन किंवा पक्षीय राजकारण करून शेतक-यांची दिशाभुल करून अफवा पसरू नका. या विषयाचा सर्व अभ्यास मी केला आहे. सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. गावांमधुन शेतक-यांची कमिटी तयार करा. आपण न्यायालयीन लढा देऊ. शेतकरी - संरक्षण खाते यांच्यात समन्वयाची भूमिका ठेवणार आहे. मात्र हा विषय मार्गी लावणारच, असा निर्धार खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केला.

ढवळपुरी (ता.पारनेर) येथे आज के.के.रेंज जमीन अधिग्रहण विषयाबाबत खासदार विखे पाटील यांच्यासह माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी सवांद साधत भुमिका स्पष्ट केली.

हेही वाचा - खंडित वीज पुरवठ्यावर शेतकऱ्यांनी शोधली ही शक्कल

विखे म्हणाले, खासदार झाल्यानंतर बहु प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्याने मार्गी लावत आहे. त्यामधील नगरचा उड्डाणपुल आसेल तोदेखील संरक्षण खात्याशी संबंधित विषय होता. आपण सातत्याने पाठपुरावा करून तो मार्गी लावला. के.के. रेंज विषय हादेखील संरक्षण खात्याशी संबंधित आहे. त्याचे सर्व कागदपत्र देखील आपणाकडे आहेत. तुम्ही ठरवा काय निर्णय घ्यायचा आहे. कमिटी तयार करा. त्यामध्ये मुख्यतः बाधित शेतकरी असावेत. त्यांच्याशी आम्ही समन्वय साधु न्यायालयीन लढ्याची आमची तयारी आहे. हा विषय खासदारकीच्या काळात मार्गी लावणारच आहेत. किती दिवस या विषयाची नुसती चर्चा होणार आहे

माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनीही भुमिका मांडली. सुजित पाटील झावरे म्हणाले, आमच्या शेतक-यांनी मोठ्या कष्टाने ही जमिन तयार केली आहे. ती आम्ही जाऊ देणार नाही. आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. तुमची खासदारकी पणाला लावा पण आमचा हा प्रश्न मार्गी लावा. आणि हा प्रश्न तुम्हीच सोडवु शकता.संरक्षण केंद्रीय मंत्र्यांची भेट असो किंवा लष्करप्रमुखांची चर्चेतदेखील आपण शेतक-यांचीच बाजू लावून धरली हे आम्ही पाहिले. आपण शेतक-यांच्या हिताचीच भुमिका घेताल यात शंका नाही.

यावेळी राहुल शिंदे,वसंत चेडे,राजेश भनगडे,शिवाजी खोडदे,दत्तात्रय पवार,सुखदेव पवार उपस्थित होते.

संपादन - अशोक निंबाळकर