Nagar : तनपुरेंकडून गडकरींच्या भोजनाचा घाट!

कोपरगाव-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवासाची अट
nitin gadkari ,prasad tanpure news
nitin gadkari ,prasad tanpure news esakal

राहुरी : केंद्रीय रस्ते वाहतूक व बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी अचानक कोपरगाव-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनातून प्रवास करावा. महामार्गाच्या दुरवस्थेचा स्वतः अनुभव घ्यावा आणि माझ्या घरी भोजनाला यावे,असे आमंत्रण माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिले.

राहुरी येथे आज (रविवारी) पत्रकारांशी बोलताना तनपुरे म्हणाले, केंद्रीय मंत्री गडकरी यांना आमंत्रण देण्यामागे कुठलाही राजकीय उद्देश नाही. कोपरगाव-अहमदनगर रस्त्याचे भाग्य उजळण्याची क्षमता फक्त त्यांच्यात आहे. ते राजकारणविरहित दूरदृष्टीचे, अभ्यासू व व्हीजन असलेले नेतृत्व आहे. त्यांनी या महामार्गावर प्रवास केल्यावर सर्वसामान्य जनतेचा त्रास, हालअपेष्टा, जीविताचा धोका त्यांना याची देही याची डोळा दिसेल, एवढाच मुख्य उद्देश आहे.

पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त निविदा भरल्यावर पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली जाते. कोपरगाव-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गासाठी ठेकेदाराने तब्बल २६ टक्के कमी दराने निविदा भरली. जीएसटीसह ४९ टक्के कमी रक्कमेची निविदा स्वीकारणे अव्यवहार्य होते. त्याचवेळी ठेकेदार काम पूर्ण करू शकत नाही, यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे ठेकेदार अर्धवट काम सोडून पळून गेला. हे होणारच होते. परंतु, ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना ठिकठिकाणी चौपदरी रस्त्याची एक बाजू खोदून ठेवली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. अगोदरच खड्ड्यांनी महामार्ग व्यापला आहे. त्यात, एकेरी वाहतूक व अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील खड्डे मोठे व खोल झाले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्यावर अंदाज येत नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहने आदळून अपघात होत आहेत.’’

रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त प्रवाशांना अपघातांत आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडो जणांना अपंगत्व आले आहे. रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे, जनक्षोभ वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ गडकरी हेच एकमेव आशेचा किरण आहेत. त्यामुळे त्यांना आवाहन करीत आहे,असेही खासदार तनपुरे यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com