esakal | कोपरगाव पीपल्सने कर्मचाऱ्यांना दिला २० टक्के बोनस
sakal

बोलून बातमी शोधा

Kopargaon People gave 20% bonus to the employees

बँकेने दरवर्षीप्रमाणे सेवकांना 20 टक्के बोनस व सानुग्रह अनुदान तसेच सध्याचे कोविडची परिस्थिती विचारात घेता सेवकांचा 2.50 लाखाचा विमा कवच घेण्यात आला आहे.

कोपरगाव पीपल्सने कर्मचाऱ्यांना दिला २० टक्के बोनस

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव : अहमदनगर जिल्हयातील नामांकीत बँक म्हणून नावलौकिक असलेल्या येथील कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेने दिवाळीपूर्वीच आपल्या सेवकांना 20 टक्के बोनस व सानुग्रह अनुदान व अडीच लाख रुपयांचे कोविड विमा संरक्षण जाहीर केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन अतुल काले यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, मार्च, 2020 अखेर बँकेकडे 548.35 लाख भांडवल,ठेवी 266 कोटी 47 लाख, कर्ज वाटप
124 कोटी 94 लाख, गुंतवणूक 162 कोटी 13 लाख व सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा 2 कोटी 87 लाख इतका आहे. बँकेने नुकतेच नवीन अद्यावत सॉफ्टवेअर
प्रणाली घेतली आहे. याचा निश्चितच ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास फायदा होणार आहे.

बँकेने दरवर्षीप्रमाणे सेवकांना 20 टक्के बोनस व सानुग्रह अनुदान तसेच सध्याचे कोविडची परिस्थिती विचारात घेता सेवकांचा 2.50 लाखाचा विमा कवच घेण्यात आला आहे. बँकेने कर्जावरील व्याजदर कमी करुन व्यावसायीक कर्ज 9 टक्के सोनेतारण कर्ज 8.50, व गृहकर्ज 10 टक्के करण्यात आल्याचे ही चेअरमन अतुल काले यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या बैठकीत चेअरमन अतुल काले, व्हाईस. चेअरमन प्रतिभा शिलेदार, संचालक रतनचंद ठोळे, डॉ. विजय कोठारी ,कैलासचंद ठोळे, सुनिल कंगले, रवींद्र लोहाडे, धरमचंद बागरेचा, कल्पेश शहा, राजेंद्र शिंगी, सुनील बंब, सत्येन मुंदडा, वसंत आव्हाड, यशवंत आबनावे, हेमंत बोरावके, रविंद्र ठोळे, प्रभावती पांडे, जनरल मॅनेजर दीपक एकबोटे उपस्थित होते.

बँक सेवकांचे युनियन तर्फे प्रदीप नवले, सेवक प्रतिनिधी
वीरेश पैठणकर व अशोक पापडीवाल यांनी सर्व संचालकांचे आभार मानले.
संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top