कार्यकर्त्यांनाही ताकद देणार ; माजी आमदार जगताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यकर्त्यांनाही ताकद देणार; माजी आमदार जगताप

कार्यकर्त्यांनाही ताकद देणार; माजी आमदार जगताप

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : कुकडी साखर कारखाना उभारताना ‘तात्यां’नी जिवाचे रान केले. कारखाना त्यांचे स्वप्न होते. संचालक व कामगार कारखाना सर्वोत्तम चालवीत आहोत. अडचणी असल्या तरी त्या गृहीत धरून मार्गक्रमण सुरू आहे. भविष्यातील राजकीय गणिते तयार आहेत. लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करू. कार्यकर्ते आपल्यावर मनापासून प्रेम करत आहेत. त्यांनाही ताकद देण्याचे काम करू, असा विश्वास माजी आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केला..

जगताप यांचा बुधवारी (ता. २४) वाढदिवस आहे. त्यानिमित्त ''सकाळ''शी बोलताना ते म्हणाले, की शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप या दोन दिवंगत नेत्यांनी दाखविलेल्या मार्गाने चालत आहे. आमदार होतो त्यावेळी जमिनीवर पाय ठेवूनच काम केले. कोटीच्या गप्पा मारण्याची मला सवय नाही. सरकार विरोधातील असतानाही त्यावेळी कामे केली. मात्र, त्याला मर्यादा येत होत्या. विरोधकांनी कायमच पाण्याचे राजकारण केले. हा प्रश्न कसा जटिल होईल याचेच निमित्त ते शोधत राहिले. गरज असताना याप्रश्नी रस्त्यावर उतरलो. शांत बसून नियोजन केले तरी आणि रस्त्यावर उतरलो तरी राजकीय भाषा वापरली गेली. आई-वडिलांनी दिलेली शिकवण कायम लक्षात ठेवून काम करीत असल्याने, विरोधकांवर एकेरीवर टीका केली नाही, करणारही नाही.

विरोधकांनी आमची काळजी करू नये. लोकांना आमची काळजी आहे, असे सांगत जगताप म्हणाले, की कुकडी कारखाना उभारताना कुंडलिकराव जगताप यांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यांनी हे स्वप्न साकार करूनच दाखविले. त्यांनी मनात आणले असते, तर खासगी कारखानाही काढता आला असता. मात्र, त्यांनी लोकांच्या मालकीचा कारखाना काढला. यंदाच्या गाळपात नऊ लाख टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. २७ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्पही जोरात सुरू आहे. कारखाना निवडणुकीची काळजी नाही.

जगताप म्हणाले, की मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. गेल्या वेळी आमदारकीला थांबावे लागले. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. त्यापूर्वी कुकडी कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यात कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणार आहोत

loading image
go to top