दुधातून शोधला ‘भाकरीचा चंद्र’! शेतकऱ्याची बरकत अन् भरभराट...

kojagiri
kojagiriesakal

नेवासे (जि.अहमदनगर) : कवी नारायण सुर्वे एका कवितेत म्हणतात, ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच अर्धी जिंदगी बरबाद झाली.’ कुणबिक करणाऱ्यांसाठी ही कविता तंतोतंत लागू पडते. शेतीत पडतळ नाही म्हणून बहुतांश लोक दूधव्यवसाय करतात. मात्र, पशुखाद्याचे वाढते दर आणि दुधाची बाटलीबंद पाण्यापेक्षाही कमी भावाने होणारी विक्री त्याला आतबट्ट्यात घेऊन जाते. कुकाण्यातील शेतकऱ्याने यावर उपाय शोधलाय. त्याने ‘भाकरीचा चंद्र’ तर शोधलाच, शिवाय खिशात रुपयाही खुळखुळायला लावला.

कुकाण्याच्या शेतकऱ्याला आली बरकत, स्वतःचाच ब्रँड

कुकाणे येथील फोलाणे परिवाराने वीस वर्षांपासून सुरू केलेल्या म्हशीच्या दुधाचा व्यवसाय भरभराटीला आणला आहे. रोज सुमारे चारशे लिटर दुधाची थेट ग्राहकांना विक्री करतात. जयकिसान नावाने त्यांनी ब्रँडही तयार केलाय. कुकाणे येथील माजी उपसरपंच व प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब फोलाणे यांचे चार भावंडांचे एकत्र कुटुंब आहे. शेतीला जोड म्हणून सुरू केलेल्या दूधव्यवसायाची प्रगती तशी या भागात चर्चेत असते. भाऊसाहेब फोलाणे यांनी १९९८मध्ये शेतीला जोड म्हणून भाकड म्हशी खरेदी करायच्या आणि वेताला जवळ आल्यावर त्यांची विक्री करायची, हा व्यवसाय सुरू केला. मात्र, नुकसान होत असल्याने तो बंद करून, सन २०००पासून दूधव्यवसाय सुरू केला.

kojagiri
पालिका निवडणुकीपूर्वी हिंदुत्व कार्ड जोरात! नितेश राणेंचीही उडी

उत्पादनातही वाढ

पाच म्हशींपासून पन्नास लिटर दूधसंकलन व्हायचे. आता हे संकलन आणि थेट विक्री सुमारे चारशे लिटरच्या जवळ गेली आहे. त्यांनी मागणी वाढेल तशी दूधउत्पादनात वाढ केली. सध्या त्यांच्याकडे ऐंशी म्हशी आणि पंधरा संकरित गायी आहेत. दुभत्या पन्नास म्हशींपासून चारशे लिटर व दुभत्या आठ गायींपासून शंभर लिटर दूधसंकलन ते करतात. गावात पतंजलीचे दूधसंकलन केंद्र सुरू केले आहे. घरच्या शंभर लिटर दुधासह इतर शेतकऱ्यांचे मिळून सातशे लिटर दूधसंकलन करतात. दूधव्यवसायाने फोलाणे परिवाराला आर्थिक बळकटी तर दिलीच, पण शेतीलाही चांगले दिवस आले. वर्षभरात म्हशीपासून त्यांना सुमारे पाचशे टन खत उपलब्ध होते. शेणखताचा शेतीसाठी वापर वाढल्याने जमिनीचा पोत सुधारला आहे. उत्पादनातही वाढ झाली आहे. म्हशी धुतल्यानंतर, तसेच गोठ्याची स्वच्छता केलेले पाणीही शेतीला देण्याची व्यवस्था केली आहे.

एकोणीस जणांचे कुटुंब

माजी उपसरपंच व आदर्श शेतकरी भाऊसाहेब किसन फोलाणे यांच्यासह बाळासाहेब, अरुण, संदीप या चार भावांचा परिवार. चौघाही भावांचे दहावी- बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. वडिलोपार्जित शेती, दूधव्यवसायातून या कुटुंबाला चांगलीच गती मिळाली आहे. अलीकडे एकत्रित कुटुंब ही संकल्पना हरवली आहे. या कुटुंबात १९ सदस्य आहेत. आमचे कुटुंब म्हणजे दुसरे गोकुळच आहे, अशी भावना परिवारातील ज्येष्ठ सदस्य आई चंद्रभागा व मालनबाई व्यक्त करतात.

kojagiri
चीन हायपरसॉनिक मिसाइलमधुनही करु शकतो अणवस्त्र हल्ला...

थेट ग्राहकांना दर्जेदार दूध

"शेतीला दूधव्यवसाय जोड म्हणून चांगला आहे. मात्र, अलीकडच्या काळात पशुखाद्याचे वाढते दर, कोरोना संकटाच्या काळात अचडणीला सामोरे जावे लागले. थेट ग्राहकांना दर्जेदार दूध दिले तर व्यवसाय आपोआप भरभराटीला येतो. - भाऊसाहेब फोलाणे, दूधव्यावसायिक, कुकाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com