esakal | कुकडी, सीना आता धुम्माट धावणार... कारण आता प्रश्नही नाही अन अडथळाही
sakal

बोलून बातमी शोधा

Kukdi, Cena will run hard now

मतदारसंघातील कुकडी व सीना धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आठवडाभरापूर्वी मतदारसंघाचा दौरा केला होता.

कुकडी, सीना आता धुम्माट धावणार... कारण आता प्रश्नही नाही अन अडथळाही

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : कुकडी व सीना धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवारांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी व कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत धुमाळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या वेळी प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

मतदारसंघातील कुकडी व सीना धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आठवडाभरापूर्वी मतदारसंघातील रुईगव्हाण, कुळधरण, राक्षसवाडी, बारडगाव दगडी, पिंपळवाडी, करमनवाडी, करपडी, परीटवाडी, चिलवडी, राशीन, सोनाळवाडी, कोळवडी, अळसुंदे, धांडे वाडी, आंबीजळगाव, म्हाळंगी, लोणी मसदपुर, कोरेगाव, दिघी, निमगाव डाकू, घुमरी, कोकणगाव, नागलवाडी, नवसरवाडी, माही, मलठण आदी गावात अधिकाऱ्यांसमवेत दोन दिवसीय दौरा केला होता.

हेही वाचा - राळेगणसिद्धी, साकळाईच्या सर्वेक्षणाचा आदेश

तात्काळ शक्य असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुचनाही दिल्या.तालुका क्रुषि विभागाचे अधिकारी,कुकडीचे अधिकारी,बारामती क्रुषि विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनीही बैठकांमध्ये उपस्थित राहून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणुन घेत मार्गदर्शन केले होते.

यावेळी पाणी संदर्भात प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी सांगितलेल्या अडचणी समजाऊन घेत त्या अडचणी लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते.याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांचे उर्वरीत प्रश्न सोडवण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी व कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत धुमाळ यांच्या समवेत पुणे येथील सिंचन भवनात नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

पाणी नियोजन, भूसंपादन, चाऱ्याची दुरुस्ती आदी महत्वाच्या असलेले विषय सोडवत असताना अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेले हे विषय मार्गीही लागले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या तसेच शेतकऱ्यांना पाणी नियोजनासंबंधी असणाऱ्या अडचणी याबाबत असणारी कामे वेगाने मार्गी लावण्याचे संदर्भात आपण वेळोवेळी पाठपुरावा केला. तसे आश्वासन अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिले.

-रोहित पवार, आमदार, कर्जत जामखेड

संपादन - अशोक निंबाळकर