
Sangamner Crime
संगमनेर: शहरातील एका कापड दुकानात काम करून घरी जाणाऱ्या तरुणाला पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कोयत्याचा धाक दाखवून पाच हजार रुपये काढून घेतले, तसेच कोयत्याने डोक्यावर आणि दगडाने पाठीवर मारून दुखापत केली. त्यानंतर म्हाळुंगी नदीवरील पुलावरून ढकलून देत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी तिघांसह अनोळखी दोन जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.