म्हणून करपडी झाले पाणीदार, इतक्या हेक्टरला होणार फायदा

The lake in Karpadi is full due to rains
The lake in Karpadi is full due to rains
Updated on

राशीन : करपडी (ता.कर्जत) येथील पाझर तलाव एक पावसाच्या पाण्याने भरल्याने करपडीकरांचे पाणीदार होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. करपडी, परीटवाडी, राशीनसह परिसरातील सुमारे पाचशे हेक्‍टर क्षेत्राला या पाण्याचा लाभ होणार अाहे. 

या गावातील पाणीटंचाई यामुळे संपणार असल्याची माहिती करपडीचे माजी सरपंच सुनील काळे यांनी दिली. 
समाधानकारक पावसामुळे करपडीतील हा पाझर तलाव भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.

हे पाझर तलाव व्हावेत यासाठी माजी सरपंच सुनील काळे, उपसरपंच अशोक माने, सरपंच भागवत खेसे, युवराज हाके, ईस्माइल पठाण यांनी तत्कालीन पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून या कामाचा आग्रह धरला होता.

माजी सरपंच शेटे यांनी दिली जमीन म्हणून

विशेष बाब म्हणून दोन कोटी अडोसष्ट लाख रूपयांचा निधी या तलावासाठी मंजूर करून दोन तलाव साकारण्यात आले. त्यातील एक तलावाचे थोडे काम राहिले आहे. या पाझर तलावांसाठी राशीनचे माजी सरपंच शिवदास शेटे यांनी आपल्या जमिनीचे दानपत्र देण्याचा मोठेपणा दाखवल्याने हे दोन्ही पाझर तलाव साकार झाला. 

या दोन्ही पाझर तलावांमुळे करपडीची दुष्काळी गाव म्हणून असलेली ओळख पुसली जाणार आहे. गायरान जमीन आणि शेटे यांची दहा एकर जमीन या तलावाच्या पाण्याखाली जात आहे.

या तलावाजवळच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम चालू अाहे. लवकरच पिण्याचे फिल्टर पाणी मिळेल, असा दावा काळे यांनी केला आहे. शेजारी असणाऱ्या गायरान जमिनीत वृक्ष लागवड करून उद्यान निर्मिती व दशक्रिया विधीचा घाट ही विकासकामे करण्याचा करपडी ग्रामपंचायतीचा मानस असल्याचे व लवकरच या पाझर तलावातील पाण्याचे पूजन राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात येईल असे काळे यांनी सांगितले
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com