तलाव, नाले ओव्हर फ्लो, सोनईला पुराचा धोका

विनायक दरंदले
Thursday, 17 September 2020

जून महिन्यातच हे दोन्ही तलाव निम्मे भरले होते. नंतरही चार ते पाच मोठे पाऊस झाले व काल बुधवारी(ता.१६) ला रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने दोन्ही तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

सोनई: अर्धा टीएमसी क्षमतेचा धनगरवाडी तलाव व २५० एमसीएफटी क्षमतेचा मोरया चिंचोरे तलावासह सर्व बंधारे आज तुडूंब भरुन सांडव्यातून पाण्याची धार सुरु झाली आहे.जुन महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनच्या पावसाने प्रथमच जिरायत भागातील लोहगाव, धनगरवाडी, मोरया चिंचोरे,झापवाडी, वांजोळी भागात
दमदार हजेरी लावली.

जून महिन्यातच हे दोन्ही तलाव निम्मे भरले होते. नंतरही चार ते पाच मोठे पाऊस झाले व काल बुधवारी(ता.१६) ला रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने दोन्ही तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

दोन्ही तलाव भरल्याने आता नव्याने मोठा पाऊस झाला तर सोनईची कौतुकी नदी रौद्ररुप धारण करुन संपुर्ण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा होईल, असा अंदाज असल्याने नदीपात्रातील व्यावसायिक व ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. कालच्या पावसानंतर
याच भागातील पाणी लेंडगा ओढ्यातून सोनईच्या कौतुकी नदीत आल्याने गावातील अनेक दुकानात पाणी शिरले होते. अहमदनगर

 

बुधवारी सायंकाळी व रात्री झालेल्या पावसाने परीसरातील सर्व लहान-मोठे तलाव व बंधारे
पुर्ण क्षमतेने भरले आहेत.सर्वच शेत पाण्याने तुडूंब भरलेले आहे.यामुळे जिरायत भागातील शेतकरी सुखावला आहे.
   - सुरेश बारगळ, शेतकरी.

 

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakes, Nala overflow, Sonai flood risk

Tags
टॉपिकस
Topic Tags: