
Ahilyanagar shines with lights and decorations as residents prepare for Lakshmi Pujan at 3 PM, spreading festive cheer across homes.
Sakal
अहिल्यानगर: तेजाचा अन् प्रकाशाचा सण असणाऱ्या दिवाळीला उत्साहात सुरवात झाली असून, मंगळवारी (ता. २१) दिवाळीतील महत्त्वाचा दिवस असणारे लक्ष्मीपूजन साजरे होणार आहे. अमावास्येविषयी संभ्रम असला, तरी महाराष्ट्रात मंगळवारीच लक्ष्मीपूजन दिलेले असून, लक्ष्मीपूजनासाठी दुपारी तीन वाजेपासून मुहूर्त असल्याची माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.