esakal | सावेडी स्मशानभूमीसाठी मिळाली जागा
sakal

बोलून बातमी शोधा

death

सावेडी स्मशानभूमीसाठी मिळाली जागा

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः ""कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा वाढत असून, नालेगाव अमरधामवरील भार वाढला आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या समवेत सावेडी स्मशानभूमीची पाहणी केली. तेथे साफसफाई करून अंत्यविधीस सुरवात करण्यात आली,'' अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सावेडी स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली. या कामाची पाहणी आमदार जगताप यांनी केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, उपायुक्‍त यशवंत डांगे, विद्युत विभागप्रमुख राजेंद्र मेहेत्रे, घनकचरा व अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या निर्णयामुळे सावेडी उपनगराला स्मशानभूमी मिळाली आहे.

बारस्कर म्हणाले, ""कचरा डेपोच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला होता. या भागातील नागरिकांच्या विरोधामुळे डेपो व खतप्रकल्प बंद केला आहे. आमदार जगताप यांच्या प्रयत्नातून या जागेवर स्मशानभूमी व उद्यानासह इतर प्रकल्प प्रस्तावित करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे. मात्र, आरक्षित जागेतील 40 टक्‍के जागेच्या वापराबाबत आयुक्‍तांच्या अधिकारात निर्णय घेतला आहे. या भागामध्ये तातडीने कोरोनामुळे मृतांवर अंत्यसंस्कार होणार आहेत. याच जागी आता कायमस्वरूपी स्मशानभूमी केली जाणार आहे.

loading image