
श्रीरामपूर : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी नियोजित जागेचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. यासंदर्भात आमदार हेमंत ओगले यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.