

Bribery Scandal Rocks Shevgaon; Case Registered Against Two
शेवगाव: भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकास २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (ता.१९) सायंकाळी करण्यात आली. पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या फिर्यादीवरून भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक किरण अशोक कांगे (वय ५२, रा. अहिल्यानगर), खासगी इसम देवेंद्र त्रिंबक फुंदे (वय ४०, रा. शेवगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले.