
-विनायक दरंदले
सोनई : दोन दिवसांचा रेल्वे प्रवास व श्रीनगर येथून सोनमर्ग व दुतपथरी पर्यटनस्थळ पाहताना झालेला कारचा प्रवास व अधिक पायी फिरणे झाल्याने सर्वांना थकवा आला. मंगळवारी (ता.२२) पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्याच दिवशी तेथे सर्वांची नियोजित भेट होती; मात्र सर्वांना सकाळी लवकर जाग न आल्याने पहलगाम भेट एक दिवस पुढे ढकलून स्थानिक टुलिफ गार्डन व डललेक पाहण्याचा घेतलेला निर्णय अहिल्यानगर येथील तीन कुटुंबांसाठी जीव वाचविणारा ठरला.