लिंबू कोणी पाडिलं रे...लिंबू कोणी पाडिलं...श्रीगोंद्यात दर पडले

संजय आ. काटे
सोमवार, 29 जून 2020

आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत तहसीलदार महेंद्र माळी यांच्या दालनात याबाबत बैठक झाली. तीत बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे, व्यापारी संचालक उमेश पोटे, संभाजी ब्रिगडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, उमेश बोरुडे, सतीश बोरुडे, आदिक वांगणे, राम ठाणगे उपस्थितीत होते. 

श्रीगोंदे : तालुक्यातील लिंबू खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची व शहरातील लिंबाच्या दरात मोठी तफावत असल्याने बाजार समितीने लिंबाचे लिलाव सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समितीने त्याला तयारी दाखविली अाहे. लिलावात येणारे दर तालुक्यातील गावात लिंबू खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना द्यावे लागतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा - शिक्षक बँकेचे साडेतीनशे कोटी रूपये पडून

आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत तहसीलदार महेंद्र माळी यांच्या दालनात याबाबत बैठक झाली. तीत बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे, व्यापारी संचालक उमेश पोटे, संभाजी ब्रिगडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, उमेश बोरुडे, सतीश बोरुडे, आदिक वांगणे, राम ठाणगे उपस्थितीत होते. 

तालुक्यात लिंबू उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, लिंबाचे दर पुन्हा पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यावर तहसीलदार माळी यांनी व्यापारी व समितीला जाब विचारला. शहरातील लिंबाचे दर आणि श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांकडून लिंबू खरेही करताना देण्यात येणाऱ्या दरात मोठी तफावत चुकीची आहे. तातडीने त्यावर निर्णय घ्या शेतकऱ्यांबाबत अशा पध्दतीने चुकीचे होवू देणार नाही अशी भुमिका मांडली.

शेतकरी प्रतिनिधींनी सगळीकडे सारखेच व न्याय दर मिळावेत व त्यासाठी सोशल मीडियावरुन हे दर दुपारी जाहीर करावेत, बाजार समितीचे लिलाव दोन वर्षांपासून बंद असल्याने व्यापारी लूट करीत असल्याचा आरोप केला. त्यावर व्यापारी पोटे यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्याला जास्तीचा दर देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र जयपूरसारख्या शहरात कमी दर मिळतो.

आमदार पाचपुते यांनी लिंबू उत्पादकांची बाजू लावून धरताना बाजार समितीने लिलाव तातडीने सुरु करावेत. हेच दर सगळीकडे लागू होतील. गावात जे व्यापारी शेतकऱ्यांकडून थेट लिंबू खरेदी करतील त्यांनाही हाच दर लागू करावा लागेल असे सांगितले.

तहसीलदार माळी यांनी लवकर हे लिलाव सुरु करुन पारदर्शी कारभार ठेवून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे दाम मिळवून देण्यात बाजार समितीनेही पुढाकार घ्यावा असे सांगितले. समिती सचिव डेबरे यांनी लवकरच हे लिलाव सुरु होतील अशी ग्वाही दिली. 

 

मध्यंतरी 'सकाळ'ने या विषयावर आवाज उठविल्याने न्याय मिळाला. आता लिलाव सुरु झाले तरी बाहेरील व्यापाऱ्यांच्या त्यात सहभाग राहावा.शिवाय बाजार समितीने लिलावाच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्यादिवशीचे शहरातील ऑनलाईन लिंबू दर पाहण्याची सुविधा करावी. 
- उमेश बोरुडे, लिंबू उत्पादक शेतकरी श्रीगोंदे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lemon prices have come down in Shrigonda