शिक्षक बँकेचे साडेतीनशे कोटी रूपये पडून

Reduce pay cuts ...
Reduce pay cuts ...

नगर  : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेत कर्जवितरणाबाबतचा असलेला उठाव अत्यंत कमी आहे. यामुळे बॅंकेत 338 कोटींच्या ठेवी बिनव्याजी पडून आहेत. त्यामुळे बॅंकेने शिक्षकांच्या दरमहाच्या पगारातून कपात होणारी रक्कम 1900ऐवजी एक हजार करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व ऐक्‍य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड यांनी केली. 

थमिक शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शिक्षक बॅंक ही जनमानसात अतिशय सुरक्षित असल्यामुळे, तसेच कर्जवसुली शंभर टक्के असल्यामुळे ठेवीदारांचा ओढा दिवसेंदिवस वाढतच आहे.

मात्र, जमा होत असलेल्या ठेवींच्या प्रमाणात प्राथमिक शिक्षक सभासदांकडून कर्जाची उचल तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने 338 कोटींच्या ठेवी बिनव्याजी पडून आहेत. त्याचा भुर्दंड बॅंकेला बसत आहे. 

प्राथमिक शिक्षकांच्या दरमहाच्या वेतनातून कायम ठेव ही एक हजार केल्यास बिनव्याजी ठेवींच्या रकमेची वाढ कमी होऊन बॅंकेचे आर्थिक नुकसान न होता शिक्षक सभासदांना नऊशे रुपये इतका फायदा प्रतिमहिना होईल. कर्जाचा व्याजदरसुद्धा कमी करता येईल, असे सुरेश नवले यांनी म्हटले आहे. 

या  निवेदनावर जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय  परहर, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com