
अकोले : तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली असून, देवठाण येथे एका महिलेस, तर कोतूळ येथील पती-पत्नीस जखमी केल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. कोतूळपासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर रेणुकानगर येथे रात्री वीज गेल्याने बिबट्याने थेट घरात प्रवेश करून लक्ष्मीबाई रामनाथ आरोटे यांच्यावर हल्ला केला.