

Akole Shocker: Brave Father Rescues Injured Daughter from Leopard Attack
sakal
संगमनेर: अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २०) सायंकाळी घडली. या हल्ल्यात अवनी मनोज गुंजाळ (वय ४) ही गंभीर जखमी झाली असून तिच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत आणि जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली.