टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील खोकर-भोकर शिवारात बिबट्याचा संचार आहे. खोकर येथे बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पडला आहे. खोकर-कारेगाव रोडलगत गट नंबर ५१ मधे वास्तव्यास असलेल्या कुसुमबाई सोन्याबापू भणगे यांच्या घरासमोरील शेडमध्ये लोखंडी जाळीत बांधलेल्या १० शेळ्यांपैकी दोन शेळ्या, एक बोकड व एक पाठ अशा चार शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. भणगे कुटुंबीयांच्या ही गोष्ट सकाळी लक्षात आली.