Leopard Attack : बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला; परिसरात भितीचे वातावरण
रविवारी सकाळी साडेअकरा वाजता हापसे वस्ती नजीक अण्णासाहेब तोडमल यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्या असल्याचे ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना निदर्शनास आले. त्यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना माहिती दिली.
Leopard attacks a farmer in a rural area, leaving the community in fear. Authorities are investigating the wildlife threat."Sakal
राहुरी : मानोरी येथे बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार खासगी रुग्णालयात करण्यात आले. विठ्ठल हापसे (रा. मानोरी) असे हल्ल्यात जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.