
संगमनेर : तालुक्यातील खराडी येथील दत्तात्रय भाऊसाहेब पर्बत या शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून बिबट्याने तीन गायी जखमी केल्या आहेत. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. यावेळी वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या पथकाने बिबट्यास जेरबंद केले. मात्र, बिबट्या आजारी असल्याने त्याला औषधोपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले.