
नारायणगाव : येथे अज्ञात वाहनाची धडक बसून तीन ते चार महिन्यांचा बिबट्याचा बछडा ठार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारात घडली. पुणे-नाशिक महामार्गावरील बाह्य वळण रस्त्यावर येथील निसर्ग हॉटेलजवळ, पुण्याहून नाशिककडे अज्ञात वाहन जात होते. त्यावेळी हा अपघात झाला, अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.