
संगमनेर : तालुक्यासह शहरानजीक बिबट्यांचा मुक्त संचार कायमच पहायला मिळतो. त्यातच गेल्या वर्षभरात बिबट्यांनी तिघांचा जीव घेतल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची तात्पुरती नसबंदी करण्याची मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली होती. त्याच्या या मागणीची राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दखल घेतली असून, केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.