Leopard Attack in Mohari: शेतकरी आपल्या जनावरांना चारण्यासाठी दररोज डोंगरावर जातात. पावसाळ्यामुळे पाच वाजेनंतर शेतकरी जनावरे घेऊन परतत असतात. मात्र, शनिवारी (ता.२६) लखन श्रीरामे यांचा एक बैल मागे राहिल्याने त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले.
खर्डा: मोहरी गावातील चांभार खोरी शिवारातील शेतकरी लखन श्रीरामे यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकाराने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.