
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे आज (गुरुवारी) श्री विवेकानंद नर्सिंग होमच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीत एक बिबट्या पडलेला आढळला. बिबट्याला पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी मोठी गर्दी केली. वन खात्याच्या पथकाने पाण्याच्या टाकीत पिंजरा सोडून दोन तासांच्या अथक प्रयत्नाने बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.