
राहाता : चितळी रोडवरील १५ चारी परिसरातील सुनील सदाफळ यांच्या पंचकृष्णा डेअरीमध्ये दोन बिबट्यांनी प्रवेश करत लॅबमध्ये धुमाकूळ घातला, तर दुसरीकडे एकरुखे येथील बशीर शेख यांच्या वस्तीवर याच बिबट्यांनी शेळीवर हल्ला केला. शेळ्यांच्या आवाजाने शेख कुटुंब जागे झाल्याने दोन्ही बिबटे पळून गेले. या प्रसंगातून डेअरीच्या रखवालदाराचे प्राण श्वानाने वाचवले.