नगर : लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित व्यक्ती आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करीत आहेत. या अर्जासाठी आरोग्य प्रमाणपत्राची अवश्यकता आहे. हे आरोग्य प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, महापालिकेचे रुग्णालय येथे मिळत आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सध्या नागरिकांच्या या रुग्णालयांसमोर रांगा लागल्या आहेत. हे प्रमाणपत्र अर्जासह सदर केल्यावर त्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित तालुक्यातील तहसीलदारांना देण्यात आली आहे.
लॉकडाउनमुळे जिल्ह्यात देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील नागरिक फसले आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावी परत जायचे आहे. तसेच त्यासाठी हे नागरिक आरोग्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालये व महापालिकेचे रुग्णालय येथे रांगेत उभे आहेत. त्यांची थर्मलस्कॅनिंग करण्यात येत आहे. तसेच आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास या रुग्णांना त्वरीत उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात येणार आहे. हे नागरिक प्राप्त झालेले आरोग्य प्रमाणपत्र घेऊन जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाईन अर्ज करत आहेत. या ऑनलाईन अर्जावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार निर्णय घेत आहेत. या रुग्णांना त्यांच्या गावाला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या वाहनांतून पाठविण्यात येत आहे.
तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांसाठी निर्गमित करण्यापूर्वी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यांच्या कार्यक्षेत्रात प्राप्त होणाऱ्या अर्जांनुसार जिल्हानिहाय याद्या तयार कराव्यात. अशा सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून तसे प्रमाणपत्र संबंधित व्यक्तीला देण्याचे नियोजन करावे. ज्या जिल्ह्यात जायचे आहे, तेथील जिल्हाधिकारी अथवा प्राधिकृत अधिकाऱ्यांची आवश्यक ती परवानगी असल्याची खात्री करावी. वाहनाची व्यवस्था नसेल, तर एसटी आगारव्यवस्थापकांशी समन्वय साधून बसची व्यवस्था करावी. बसचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंगसह आसनव्यवस्थेची खात्री केल्यावरच बस रवाना कराव्यात. मजूर, भाविक, विद्यार्थी, पर्यटकांना प्राधान्य द्यावे. कुठल्याही परिस्थितीत वैयक्तिक पास देऊ नयेत, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आदेश आहेत. त्यानुसार या नागरिकांना सोडण्यात येत आहे.
लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील, तसेच परजिल्ह्यातील 250 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने काल सायंकाळपर्यंत गावी रवाना केले. महापालिकेच्या निवारा केंद्रांत असलेल्या 103 नागरिकांची काल महापालिकेने वैद्यकीय तपासणी केली. त्यांची आज त्यांच्या गावी रवानगी होण्याची शक्यता आहे. महापालिका निवारा केंद्रांत असलेल्या उर्वरित नागरिकांच्या तपासण्या आज होणार आहेत.
जिल्ह्यात अडकलेले परप्रांतीय व परजिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यानुसार तारकपूर आगारात 20 बस तयार केल्या आहेत. या बसचे निर्जंतुकीकरण महापालिका पथकाने केले. काल सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाने 250 जणांना त्यांच्या गावी पाठविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.